ट्रम्प यांची यूक्रेन शांती चर्चेतून माघार घेण्याची शक्यता
वॉशिंग्टन, 8 डिसेंबर (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यूक्रेन शांती चर्चेबाबत निराश आहेत आणि ते या प्रक्रियेतून माघार घेऊ शकतात, असा त्यांनी संकेत दिला. एका कार्यक्रमादरम्यान ट्रम्प म्हणाले की ते थोडे निराश आहेत, कारण युक्रेनचे राष
ट्रम्प यांची यूक्रेन शांती चर्चेतून माघार घेण्याची शक्यता


वॉशिंग्टन, 8 डिसेंबर (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यूक्रेन शांती चर्चेबाबत निराश आहेत आणि ते या प्रक्रियेतून माघार घेऊ शकतात, असा त्यांनी संकेत दिला. एका कार्यक्रमादरम्यान ट्रम्प म्हणाले की ते थोडे निराश आहेत, कारण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेंस्की यांनी अद्याप शांती प्रस्ताव वाचलाही नाही. ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा अमेरिका आणि युक्रेनच्या प्रतिनिधींमधील अमेरिकेत झालेल्या चर्चेला कोणताही निकाल लागलेला नाही.

वॉशिंग्टन डीसीतील केनेडी सेंटरच्या रेड कार्पेटवर माध्यमांसोबत बोलताना ट्रम्प म्हणाले, “मी थोडा निराश आहे, कारण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेंस्की यांनी अजून शांती प्रस्ताव वाचलाही नाही.” ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनीही दावा केला की त्यांचे वडील यूक्रेन शांती चर्चेतून माघार घेऊ शकतात. दोहा फोरममधील भाषणात त्यांनी यूक्रेन हा रशियाच्या तुलनेत अधिक भ्रष्ट देश असल्याचे सांगितले आणि जेलेंस्की यांना “उत्कृष्ट प्रचारक” असेही म्हटले.

अमेरिका आणि युक्रेनचे प्रतिनिधी यांच्यात मियामीमध्ये तीन दिवस चर्चा झाली, परंतु कोणताही तोडगा निघू शकला नाही. दोन्ही बाजूंनी चर्चा सकारात्मक असल्याचे म्हटले, पण काही मुद्द्यांवर युक्रेन सहमत नव्हता. विशेषतः रशियाने ताब्यात घेतलेल्या प्रदेशांवरील दावा सोडण्यास युक्रेन तयार नाही. त्यातच युक्रेनमध्ये सध्या भ्रष्टाचाराचा मुद्दा वाढला आहे. शांती चर्चेत सहभागी असलेल्या युक्रेनचे वरिष्ठ अधिकारी अंद्रिये येरमाक यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांच्या घरावर छापेमारी झाली आणि त्यांनी नंतर राजीनामा दिला.

यापूर्वी मॉस्कोमध्ये अमेरिका आणि रशिया प्रतिनिधींमध्ये बैठक झाली, पण त्यातही काही निष्कर्ष निघाला नाही. त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही सांगितले की चर्चा चांगली झाली, पण शांती करार करणे सोपे नाही. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेंस्की लवकरच ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीच्या राष्ट्राध्यक्षांसोबत लंडनमध्ये बैठक घेणार आहेत.

संपूर्ण परिस्थितीतून स्पष्ट होते की यूक्रेन शांती प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होत चालली आहे. याच कारणामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निराशा व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande