
बीड, 8 डिसेंबर (हिं.स.)। जिल्हातील नादलगाव येथील आदिवासी समाजातील ग्रामरीजगार सेवकाला जातिवाचक शिविगाळकरून गावातील काही गावगुंडानी दोन्ही पाय मोडून मारहाण केल्याची घटना ६ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
जालिंदर सुरवसे (३५) याला घरात घुसून अनुषा उत्तम राऊत, गोविंद सखाराम राऊत, भगवान अनुबा राऊत, विष्णू अनुबा राऊत वाच्यासह गावातील काही गुडांनी जालिंदर सुरासे यांना घरातून बाहेर ओढून तु लय माजलास, तुला आम्ही सोहणार नाहीत, जिवे मारून टाकूत, तुझ्या कुटुंबाला गावात राहू देणार नाहीत अशा धमक्या देत जातिवाचक शिविगाळ करत सुरवसे बाला दुचाकीला बांधून गावातील चौकात ओवत नेहून लाथाबुक्यानी आणि लॉखडी रोड, काट्यांनी मारहाण करून खिश्यातील ५० हजार रूपये मोबाईल काढून घेऊन दोन्ही पाय मोडून डोक्याला मारहान गावातील दहा ते बारा गुंडानी केली आहे. तलवाड़ा पोलीस स्टेशन बेथे जालिंदर सुरवसे ग्राची बहिण उषा सांबूके आणि आई ह्या दोधी मारहाण केल्यांनंतर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्या असता त्यांना पोलिसांनी राजकिय दयावा पोटी दाबधडक करून पोलिस स्टेशनच्या बाहेर काढले. तरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित गावगुंडांवर कारवाई करून संबंधित अदिवासी कुटुंबाला न्याय देण्याची मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis