अमरावती : शेतीच्या वादातून महिलेला मारहाण
अमरावती, 8 डिसेंबर (हिं.स.)। तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील एका महिलेला शेतीच्या वादातून घरात घुसून अश्लिल शिवीगाळ करून तिघांनी काठीने मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. चांदूरेल्वे पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. दीपाली राज
अमरावती : शेतीच्या वादातून महिलेला मारहाण


अमरावती, 8 डिसेंबर (हिं.स.)। तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील एका महिलेला शेतीच्या वादातून घरात घुसून अश्लिल शिवीगाळ करून तिघांनी काठीने मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. चांदूरेल्वे पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. दीपाली राजेश बनसोड (वय ४०) यांच्या लेखी तक्रारीनुसार त्यांचे पती राजेश बनसोड व भासरे मनोज विष्णुजी बनसोड यांच्यात शेतीचा वाद आहे. दोघांचे पटत नाही आणि ते एकमेकांशी बोलत नाही. रविवारी सकाळी १० वाजता दीपाली बनसोड या त्यांच्या घरी एकट्या असताना त्यांचा पुतण्या मनिष मनोज बनसोड हा घरासमोर आला आणि त्यांच्या मुलीबद्दल वाईट बोलून अश्लिल शिवीगाळ करीत वाद घातला. त्यानंतर त्याचे आई-वडिल मनोज व साधना मनोज बनसोड त्यांच्या घरी आले. दीपाली यांच्याशी भांडण करू लागले. मनोज व मनिष यांनी दीपाली यांना काठीने मारहाण केली. तर साधना यांनी त्यांचे केस पकडून खाली पाडल्याने त्यांची पाठ, डावा पाय व कमरेला मार लागला. तसेच ओठाला मार लागला. दीपाली यांचा मोबाईल आपटून फोडला. तिघांनी अश्लिल शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दीपाली बनसोड यांच्या लेखी तक्रारीवरून चांदूररेल्वे पोलिसांनी तिघांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande