जळगाव, 26 सप्टेंबर (हिं.स.)मागच्या काही दिवसात जळगाव जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक गावठी पिस्तूलसह जिवंत काढतूस जप्त करण्यात आले. अशीच कारवाई आता पोलिसांनी यावलमध्ये केली. यात तरुणांकडून एक जण गावठी बनावटीचे पिस्तूल खरेदीसाठी येणार असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघा आरोपींना गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. दोघांना न्यायालयात हजर केले असते दोघांना २८ सप्टेंबरपर्यंतची चार दिवसाची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.यावल शहरातील बोरावल गेट जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील रहिवाशी युवराज उर्फ युवा राजू भास्कर (34) हा तरुण भूषण कैलास सपकाळे (31, वराडसीम, ता.भुसावळ) या तरुणाला गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करीत असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली होती.
यावल शहराच्या बाहेर अंकलेश्वर-बऱ्हाणपूर मार्गावरील दहिगाव फाट्याजवळ हा विक्रीचा व्यवहार बुधवारी रात्री सुरू होता. तेथून पोलिसांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. दरम्यान, या तरुणाने यापूर्वदिखील काही जणांना गावठी बनवण्याची पिस्तूल विक्री केली आहे का ? याचा तपास आता पोलीस करीत आहे. हा तरुण गेल्या काही दिवसापासून गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करत असत्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तो हे गावठी पिस्तोल कुठून आणत होता. त्यांनी अजून कोणा कोणाला विकले याचा तपास आता पोलीस कोठडी पोलीस करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर