जळगाव, 26 सप्टेंबर, (हिं.स.) वरखेडी ता. पाचोरा येथील धनराज सुभाष सुतार (वय – ३५) हा शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर काम करीत असतांना अचानक पाय घसरुन खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नवरात्रोत्सवात आई समोरच ही दुर्घटना घडल्याने वरखेडी व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक धनराज सुभाष सुतार याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, दोन थोरले भाऊ असा परिवार असून धनराज हा घरातील कर्ता पुरुष होता. तो उत्कृष्ट सुतार काम करीत असल्याने परिसरात प्रसिद्ध सुतार काम करणारा कारागीर म्हणून ओळखला जायचा.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर