नाशिक : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जाळण्याचा प्रयत्न
नाशिक, 27 सप्टेंबर (हिं.स.)। - अवैध धंद्याविषयी ग्रामपंचायतीने ठराव करून सरपंचाने नोटीस दिल्याचा राग आल्याने कार्यालयात कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंगावर पेट्रोल फेकून काडेपेटीने फेकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आ
नाशिक : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जाळण्याचा प्रयत्न


नाशिक, 27 सप्टेंबर (हिं.स.)।

- अवैध धंद्याविषयी

ग्रामपंचायतीने ठराव करून सरपंचाने नोटीस दिल्याचा राग आल्याने कार्यालयात कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंगावर पेट्रोल फेकून काडेपेटीने फेकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी नरेंद्र सखाराम शिरसाठ (रा. पंचरत्न अपार्टमेंट, हिरावाडी, पंचवटी) हे लाखलगाव ग्रामपंचायत अधिकारी म्हणून काम पाहतात. शिरसाठ हे दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कार्यालयीन कामकाज करीत

होते. त्यावेळी आरोपी समाधान बाळू जाधव (रा. लाखलगाव, ता. जि. नाशिक) हा कार्यालयात आला.

लाखलगाव ग्रामपंचायतीने ठराव करून तेथील सरपंचाने समाधान जाधव याला त्याच्या अवैध धंद्याविषयी नोटीस दिली होती. त्याचा राग मनात धरून

समाधान जाधव याने ग्रामपंचायत अधिकारी शिरसाठ यांच्या अंगावर पेट्रोल फेकून काडेपेटीने पेटवून त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दहशत निर्माण केली. त्यानंतर अधिकाऱ्याला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande