अकोला - उमईच्या पुलानजीक इसमाची निर्घृृण हत्या, तर एक गंभीर
अकोला, 28 सप्टेंबर (हिं.स.)। मूर्तिजापूर तालुक्यातील उमई -जांभा रोडवर असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलानजीक एका ४२ वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे उमई व जांभा गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी सकाळी ८ वाजताच
P


अकोला, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

मूर्तिजापूर तालुक्यातील उमई -जांभा रोडवर असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलानजीक एका ४२ वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे उमई व जांभा गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घटना समोर आली असून दिपक अवधूत वानखडे असे मृतकाचे नाव आहे, तर या घटनेत श्रीराम वानखडे हे गंभीर जखमी झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande