परभणी : आपले पालम' या व्हाॅट्सअप ग्रुप द्वारे पूरग्रस्तांच्या मदतीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन
परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)।आपले पालम या.व्हाॅट्सअप ग्रुपच्या वतीने आज शेतकरी मायबाप जगला पाहिजे,जगाचा पोशिंदा माझा बळीराजा या संकटातून सावरला पाहिजे, यासाठी आज पालम तहसील कार्यालयासमोर जोरदार एक दिवशीय धरणे आंदोलन सूरू करण्यात आले. त्या आंदोलनांमध
आपले पालम' या व्हाॅट्सअप ग्रुप द्वारे पूरग्रस्तांच्या मदतीच्या मागणीसाठी जोरदार धरणे आंदोलन सूरू


परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)।आपले पालम या.व्हाॅट्सअप ग्रुपच्या वतीने आज शेतकरी मायबाप जगला पाहिजे,जगाचा पोशिंदा माझा बळीराजा या संकटातून सावरला पाहिजे, यासाठी आज पालम तहसील कार्यालयासमोर जोरदार एक दिवशीय धरणे आंदोलन सूरू करण्यात आले.

त्या आंदोलनांमध्ये ग्रुपमधील सदस्य व शेतकरी वर्ग या सर्वांच्या वतीने सरकारला विनंती करण्यात आली कि शेतकऱ्याच्या संकटामध्ये आपण सोबत रहावे,हीचआम्हा शेतकऱ्याची कष्टकऱ्यांची विनंती आहे. आपण शेतकऱ्यांची बाजू घेऊन भरगच्च अशी मदत केली पाहिजे. कारण शेतात पाणी नाही तर पाण्यात शेत आहे. सध्या मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशः अशा भयानक संकटामध्ये आहे. येणारी दिवाळी ही लेकरांनी कशी साजरी करावी हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे.जगण्यासाठी धडपड करणाऱ्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी सरकारने शेतकऱ्याच्या मागण्या या मान्य केल्या पाहिजे. अशी ही अपेक्षा व्यक्त केली या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रुप मधील सदस्य व अन्य नागरिक सहभागी होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande