पुणे - नदी सुधार प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
पुणे, 29 सप्टेंबर (हिं.स.)पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका नदी सुधार प्रकल्प समन्वयाने राबवत आहेत. हा प्रकल्प राबवत असताना मुळा व मुठा नदीवरील पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या, नदी स्वच्छता, जलप्रवाहातील अडथळे दूर करण्यासह पूरस्थिती नियंत्रणाच
ajit pawar


पुणे, 29 सप्टेंबर (हिं.स.)पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका नदी सुधार प्रकल्प समन्वयाने राबवत आहेत. हा प्रकल्प राबवत असताना मुळा व मुठा नदीवरील पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या, नदी स्वच्छता, जलप्रवाहातील अडथळे दूर करण्यासह पूरस्थिती नियंत्रणाच्या दृष्टिने उपाययोजना राबवाव्यात, सर्व विभागांनी यापूर्वीसारखेच समन्वय ठेवून काम करावेत, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी नदीवर राबवण्यात येणाऱ्या नदी सुधार प्रकल्पांबाबत आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), जलसंपदा विभाग, केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) अशा नदी सुधार प्रकल्पासंबंधित सर्व शासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक आज पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य इमारतीतील कै. मधुकर पवळे सभागृह येथे पार पडली.

या बैठकीला राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम,पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीए अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला,पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande