परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते तथा परभणीचे भूमिपुत्र अजिंक्य वाल्मिकी राऊत यांचे सोमवारी माजी आमदार सुरेशदादा देशमुख यांच्या परिवारातर्फे यथोचित स्वागत करण्यात आले.
राऊत यांनी देशमुख यांच्या आठवण' या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली , महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती गणेश देशमुख, भाई देवडे अजय निंबाळकर यांच्यासोबत हितगुज केले.यावेळी देशमुख परिवारातर्फे सौ. विमलताई देशमुख,गणेश देशमुख सौ.कोमल देशमुख, भाई देवडे,अजय निंबाळकर ,सौ.दिपा निंबाळकर यांनी यथोचित असे स्वागत केले. अभिनेता राऊत यांच्या झी टीव्हीवरील गाजणाऱ्या विठू माऊली'यासह अन्य मालिकातील उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक केले,चित्रपट क्षेत्रातील पदार्पण व येणाऱ्या पहिल्या चित्रपटासही व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान अजिंक्य राऊत यांचा पुढील महिन्यात सात नोव्हेंबर रोजी अभंग तुकाराम' हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अजिंक्य यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बजावली आहे. हा चित्रपट मराठी रसिकांच्या पसंती निश्चितपणे उतरेल असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis