पालघर : अनेक पाडे 78 वर्षांनंतरही रस्त्याविना
पालघर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। जव्हार तालुका हा अतिदुर्गम आदिवासी तालुका असून स्वातंत्र्याला ७८ वर्षे उलटून देखील अनेक गाव-पाडे, वाड्या-वस्त्यांना रस्ते उपलब्ध नाहीत. नुकत्याच घडलेल्या घटनेत, चांभारशेत येथील नारनोली पाड्यावर रस्ता नसल्यामुळे महेंद्र ज
७८ वर्षांनंतरही रस्त्याविना पाडे; शिवसेनेची भगवान बिरसा मुंडा व ठक्कर बाप्पा योजनेतून तात्काळ रस्ते मंजूर करण्याची मागणी


पालघर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।

जव्हार तालुका हा अतिदुर्गम आदिवासी तालुका असून स्वातंत्र्याला ७८ वर्षे उलटून देखील अनेक गाव-पाडे, वाड्या-वस्त्यांना रस्ते उपलब्ध नाहीत. नुकत्याच घडलेल्या घटनेत, चांभारशेत येथील नारनोली पाड्यावर रस्ता नसल्यामुळे महेंद्र जाधव या व्यक्तीचा मृतदेह डोलीवर व लाकडाला बांधून तब्बल दोन किलोमीटर चालत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. या पाड्यावर तातडीने रस्ता करावा, तसेच संपूर्ण तालुक्यातील गाव-पाड्यांना रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)तर्फे करण्यात आली आहे.

शिवसेना शिष्टमंडळाने नुकताच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांना यासंदर्भात निवेदन दिले. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना १८ ऑगस्ट २०२३ रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केली होती. त्यानंतर शासनाने १३ सप्टेंबर २०२५ रोजी आदेश निर्गमित केला होता. मात्र, अद्याप या योजनेतून जव्हार तालुक्यात एकही काम मंजूर झालेले नाही.

तसेच, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून फक्त ठराविक ग्रामपंचायतींचे प्रस्तावच मंजूर केले जातात, असा आरोप करून कोणताही भेदभाव न करता संपूर्ण जव्हार तालुक्यातील गाव-पाड्यांसाठी रस्ते मंजूर करावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.

या प्रसंगी जिल्हाप्रमुख अनुप पाटील, लोकसभा सहसंपर्कप्रमुख निलेश गंधे, उपजिल्हाप्रमुख प्रफुल्ल पवार, विक्रमगड विधानसभा संपर्कप्रमुख विजय अंभिरे, तालुकाप्रमुख श्रावण खरपडे, उपतालुका प्रमुख अरशद कोतवाल, चांभारशेत शाखाप्रमुख महेश चौधरी आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande