अहिल्यानगर - मुस्लीम धर्मगुरुंची रांगोळी काढून विटंबना प्रकरणी तणाव
- संबंधित युवकासह 30 ते 35 जण ताब्यात अहिल्यानगर, 29 सप्टेंबर (हिं.स.) - मुस्लीम धर्मगुरुच्या नावाची रांगोळी काढून त्याची विटंबना करण्यात आल्याच्या प्रकारावरून अहिल्यानगरमध्ये सोमवारी सकाळी तणाव निर्माण झाला. विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या म
अहिल्यानगर - मुस्लीम धर्मगुरुंची रांगोळी काढून विटंबना प्रकरणी तणाव


- संबंधित युवकासह 30 ते 35 जण ताब्यात

अहिल्यानगर, 29 सप्टेंबर (हिं.स.) - मुस्लीम धर्मगुरुच्या नावाची रांगोळी काढून त्याची विटंबना करण्यात आल्याच्या प्रकारावरून अहिल्यानगरमध्ये सोमवारी सकाळी तणाव निर्माण झाला. विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर येत छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील बारातोटी कारंजा येथे मुस्लीम धर्मगुरुंबद्दल रस्त्यावर रांगोळी काढून आक्षेपार्ह कृती केल्याप्रकरणी दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. सोमवारी त्याचे पडसाद उमटले. विटंबना करणाऱ्या संबंधिताविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी अहिल्यानगर -छत्रपती संभाजीनगर रोडवरील कोठला भागात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. मात्र संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आंदोलकांनी आता आंदोलन करण्याची गरज नाही, असे पोलीस समजून सांगत होते. मात्र आक्रमक तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दरम्यान छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून पोलीस वारंवार विनंती करत होते. मात्र आंदोलक ते मानायला तयार नसल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे काही वेळ गोंधळ आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

दरम्यान, काही वेळानंतर हा तणाव आता शांत झाला. पोलिसांनी संबंधित युवकाला व आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सांगितले की, जमावाला पांगवण्यासाठी हा लाठी चार्ज करण्यात आला. या प्रकरणी 30 ते 35 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande