परभणी मनपात चुकीच्या पदोन्नतीचा आरोप, चौकशीची मागणी
परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। राज्य नगरपालिका/नगरपंचायत/संवर्ग/अधिकारी कर्मचारी संघटना संलग्न परभणी शहर महानगरपालिका अधिकारी/कर्मचारी संघटना यांनी परभणी महानगरपालिकेत झालेल्या पदोन्नती प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवला आहे. निवेदनात पुढे म्हटले आ
परभणी महानगरपालिकेत चुकीच्या पदोन्नतीचा आरोप , चौकशीची मागणी


परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)।

राज्य नगरपालिका/नगरपंचायत/संवर्ग/अधिकारी कर्मचारी संघटना संलग्न परभणी शहर महानगरपालिका अधिकारी/कर्मचारी संघटना यांनी परभणी महानगरपालिकेत झालेल्या पदोन्नती प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवला आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, अधिसंख्या पदांना नियमाविरुद्ध बढती देण्यात आली असून, यासाठी गठीत समितीची किंवा शासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. 20 वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वगळून, केवळ 5 वर्षे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याला पदोन्नती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत संघटनेतर्फे उपआयुक्त बबन तडवी यांच्यावर चौकशी लावून सदर पदोन्नती तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande