भाजप आमदार रमेश आप्पा कराड यांनी केली पूरग्रस्त गावांची पाहणी
लातूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। भाजप आमदार रमेश आप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघातील शेतकरी बांधवांवर आलेल्या या महासंकटाच्या पार्श्वभूमीवर, आज मतदारसंघातील नागझरी, जेवळी, टाकळी, काटगाव, काटगाव तांडा, तांदूळजा, कानडी बोरगाव, निळकंठ, भोसा, मसला,
अ


लातूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।

भाजप आमदार रमेश आप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघातील शेतकरी बांधवांवर आलेल्या या महासंकटाच्या पार्श्वभूमीवर, आज मतदारसंघातील नागझरी, जेवळी, टाकळी, काटगाव, काटगाव तांडा, तांदूळजा, कानडी बोरगाव, निळकंठ, भोसा, मसला, भिसे वाघोली, माटेफळ सह अनेक गावांचा सखोल पाहणी दौरा केला.

गेल्या काही दिवसांपासूनच्या अतिवृष्टीमुळे खरिपातील हाताशी आलेले सोयाबीन, ऊस यांसारखी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत; तर अनेक ठिकाणी मांजरा नदीसह ओढ्यांना आलेल्या पुरामुळे जमिनी मोठ्या प्रमाणात खरडून गेल्या असून अनेकांच्या घरांचीही पडझड झाली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर उभा राहून त्यांच्या अडीअडचणी आणि व्यथा ऐकताना मन हेलावले.

या संकटाच्या काळात महायुतीचे शासन आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे जलद आणि अचूक पूर्ण करण्याचे, मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.असे कराड यांनी सांगितले

कानडी बोरगाव बॅरेजचे नादुरुस्त दरवाजे त्वरित दुरुस्त करून पाण्याचा निचरा करण्याचे, भिसेवाघोली येथे रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरीवर संरक्षण भिंत बांधण्याचे, तसेच निळकंठ येथील पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून नवीन पुलाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आपण धीर सोडू नका, आपले सरकार आपल्या सोबत आहे आणि तुम्हाला निश्चितपणे मदत मिळेल.असे ते म्हणाले

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande