नाशिक, 29 सप्टेंबर (हिं.स.)।इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता पुढील चार पिढ्यांसाठी उपयुक्त असे ज्ञान देण्यासाठी अभ्यासक्रम हवा अशी मागणी कृषी प्रयोगशील जिल्हा असलेल्या नाशिकच्या येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये करण्यात आली. दरम्यान, यावेळी पर्यावरण समतोलसह
नदी प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांवर परिषदेत मंथन करण्यात आले.
दि आर एम के मेमरी फाउंडेशन, के कॅन्सल्टेशन, मेंटल हेल्थ एम्स, व ए आर दि एस आय नाशिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दिल्लीच्या क्लायमेट चेंज संस्थेबरोबर - आय आय एस दि व सी एम आय - इन्स्टिट्यूट फॉर सस्टनेबल डेव्हलोपमेंट व कार्बन मायनस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
पर्यावरण समतोल सह नद्यांतील प्रदूषण रोखण्यासाठी भारतातील प्रथमच एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक क्लब हॉटेल आयोजित करण्यात आले.
अधिवेशनाचे उद्घाटन आयआयएसडीचे महासंचालक डॉक्टर श्रीकांत पाणीग्रहि यांच्या हस्ते पार पडले. परिषदेमध्ये नद्यांतील प्रदूषण, शहरातील किंवा छोट्या गावातील कचरा निवारण व्यवस्था, विविध व्यवसायाचे कारखाने, पाण्याचे प्रदूषण ह्या विषयांची चर्चा झाली असून परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत मोहीकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून हरीश हिंगमिरे होते.
या प्रसंगी गृहनिर्माण सल्लागार के अशोक नटराजन, वन वॉटर रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर पंकज कुमार संपत, आय आय एस सी समिती तज्ञ डॉक्टर मोहन कुमार, विजय चरहाटे, गोवा येथील पी डब्ल्यूडी माजी अध्यक्ष आनंद वाचसुंदर नाशिक एम व्हि पी सहयोगी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर पवार, बी कृषी पुनर्जीवन चे शास्त्रज्ञ डॉ. कैलास यांनी मार्गदर्शन केले. परिषद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेंटल हेल्थ संस्थेच्या संचालिका आणि डॉक्टर मंगल कर्डिले. विक्रम अहिरे, पूनम पाठक, प्रणिता होनराव, यांच्या सह के कन्सल्टेशन पूर्ण टीमचे सहकार्य लाभले.
नाशिकमधील पहिल्यांदाच आयोजित या परिषदेत राज्यासह दिल्लीतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील महत्वाच्या सरकारी यंत्रणा, तसेच दिल्लीतील तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, ओरीसा, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश अशा राज्यातून सर्व तज्ज्ञ मंडळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV