चंद्रपूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।
चंद्रपूर तालुक्यातील बेलसणी येथील सद्यस्थितीत असलेला सर्व्हे क्रमांक 382, 389, 390, 391, 392 व 393 च्या पश्चिमेकडील बाजुने असलेला व सर्व्हे क्रमांक 379 ते 381 च्या पुर्वेकडील बाजुने असलेला व शेणगावकडे जाणारा पाणंद रस्ता आता सर्व्हे क्रमांक 381 च्या पूर्व-पश्चिम व त्यानंतर उत्तर दिशेने वळून सर्व्हे क्रमांक. 379 ते 381 च्या पश्चिम दिशेने शेणगावकडे जाणा-या पाणंद रस्त्याकडे स्थलांतरीत होणार आहे. याबाबत प्रारुप अधिसुचना प्रसिध्द करून 22 डिसेंबर 2025 पर्यंत हरकती व सुचना मागविण्यात येत आहे.
मौजा बेलसणी येथील सर्व्हे नं.382, 383, 384, 385, 389/1, 389/2, 390, 391, 392, 393, 379 व 380 व मौजा मुरसा येथील सर्व्हे नं. 530 व 401 जागेवर उच्च क्षमतेचा स्टील प्रकल्प उभारणी करावयाची आहे. परंतु सदर जागेतून पाणंद रस्ता जात असल्याने स्टील प्रकल्प उभारणी करीता अडचण निर्माण होत आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 21 (1) व (2) अन्वये राज्य शासनाची मालमत्ता किंवा त्याचा भाग असलेला कोणताही सार्वजनिक रस्ता, गल्ली किंवा मार्ग जनतेच्या वापराकरिता आवश्यक नाही, अशा सरकारी रस्त्यांमधील व रस्त्यावरील आणखी कोणताही हितसंबंध किंवा हक्क असणाऱ्या किंवा अशा प्रस्तावामुळे प्रतिकूल परिणाम होण्याचा संभव असणारा कोणताही हितसंबध किंवा हक्क असणाऱ्या लोकापैकी कोणत्याही इसम किंवा इसमास पोटकलम 1 अन्वये अधिसूचना काढण्यात आल्याच्या तारखेनंतर 90 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे, अशा प्रस्तावाबाबतच्या आपल्या हरकती, अशा हितसंबधाचे किंवा हक्काचे स्वरूप आणि ज्या रीतीने त्याच्यावर प्रतिकूल परिणाम होण्याचा संभव असेल ती रीत, आणि अशा हितसंबधाबद्दल किंवा हक्काबद्दल नुकसान भरपाईच्या मागणी रक्कम आणि तपशील लेखी सादर करता येईल.
मौजा बेलसणी येथील पाणंद रस्ता लागून असलेले पश्चिम बाजूकडील सर्व्हे क्र.380, 379 पूर्व कडील बाजूला सर्व्हे 382, 389 ते 393 पर्यंत जाणारा पाणंद रस्ता स्थलांतरीत करून सर्व्हे क्र. 379 ते 381 पूर्वेकडील बाजू आणि पश्चिमेकडील बाजूस सर्व्हे क्र. 378 च्या धुर्याने दक्षिण-उत्तरेकडे जाणारा तसेच उत्तर बाजूकडील सर्व्हे क्र. 381 दक्षिणेकडील बाजूस सर्व्हे क्र. 380 च्या धुर्याने पूर्व- पश्चिम वळवून नकाशातील नमूद पाणंद रस्ताला स्थलांतरित करून आवेदकाच्या जमिनीमधून स.नं. 381, 380, 379 च्या पाणंद रस्ता दिल्यास मिलियन स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, नागपूर यांना प्रकल्प उभारण्यास अडचण निर्माण होणार नाही. तसेच सध्यास्थिती मध्ये पांदन रस्त्याचा वापर करण्याऱ्या शेतकरी यांना वाहिती करता आवेदक यांच्या पूर्णतः जमिनीतून स्थलांतरीत होणारा पाणंद रस्ता उपलब्ध होणार असल्यामुळे उक्त स. न. मधील मूळ पाणंद रस्त्याची आवश्यकता नाही.
त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम,1966 चे कलम 21 (1) व (2) जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी, 23 सप्टेंबर 2025 रोजी प्रारुप अधिसुचना प्रसिध्द केली असून 22 डिसेंबर 2025 पर्यंत हरकती व सुचना मागविण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव