चंद्रपूर :सावली तालुक्यात दोघांचा अपघाती मृत्यू
चंद्रपूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे शेतात फवारणीचे औषध खरेदी करून पोंभुर्णा येथून पेंढरी मक्ताकडे दुचाकीने येत असतांना जुनासूर्ला हद्दीत ट्रकची धडक बसल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाल्याने चंद्रपूर
अपघात  लोगो


चंद्रपूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे शेतात फवारणीचे औषध खरेदी करून पोंभुर्णा येथून पेंढरी मक्ताकडे दुचाकीने येत असतांना जुनासूर्ला हद्दीत ट्रकची धडक बसल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाल्याने चंद्रपूरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सदर घटना सोमवारी दुपारी घडली.

सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील युवक कापसाला फवारणीचे औषध खरेदी करून मोटरसायकलने गोंडपिपरी - खेडी मार्गे येत असतांना पोलीस स्टेशन मुल अंतर्गत जुनासूर्ला हद्दीत ट्रकची धडक बसली. या अपघातात सारंग गंडाटे (२६) रा. पेंढरी मक्ता याचा जागीच मृत्यू झाला तर प्रियांशु गंडाटे (२३) याचा मुल उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची झाला. दोघेही पेंढरी मक्ता येथे राहणारे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande