छ. संभाजीनगर : देवगिरी साखर कारखान्याची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। देवगिरी सहकारी साखर कारखाना लि. फुलंब्री २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. काँग्रेसचे खासदार डॉ. काळे यांनी सभेला उपस्थित सर्व मान्यवर सभासद व शेत
अ


छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। देवगिरी सहकारी साखर कारखाना लि. फुलंब्री २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. काँग्रेसचे खासदार डॉ. काळे यांनी सभेला उपस्थित सर्व मान्यवर सभासद व शेतकरी बंधूंना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की कारखाना लवकर सुरू होण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावी, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांच्या ऊसाचे योग्य मूल्य वेळेवर मिळेल अशी स्पष्ट सूचना व मागणी करण्यात आली. सभा यशस्वीरित्या पार पडली.

सभासदांचा प्रतिसाद उत्स्फूर्त व सकारात्मक होता. कारखान्याच्या कार्यपद्धतीबाबत चर्चासत्र फलदायी ठरले. शेतकरी हित हेच आमचं ध्येय! असल्याचे त्यांनी सांगितले

----------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande