पालघर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।आदिवासी क्रांतिकारकांच्या योगदानाची जाणीव नव्या पिढीला करून देणे आवश्यक असून तळागाळातील आदिवासी समाजाला संविधानिक हक्कांची आणि अधिकाराची जाणीव जागृती करण्याच्या उद्देशाने विश्व् आदिवासी अधिकार दिनाच्या निमित्ताने रविवारी 28 नोव्हेंबर रोजी सफाळे येथे जिल्हा स्तरीय आदिवासी हक्क व विचार सभेला उत्स्फूर्तपणे पार पडली. आदिवासी कार्यकर्त्यांनी आणि संघटनानी हा प्रचार आणि जागृती करण्याची जवाबदारी घ्यावी असे विचार आमदार राजेंद्र गावीत यांनी केले. आदिवासी समाजात इतर समाजाची घुसखोरी सहन केली जाणार नसून शहादा येथे निघालेल्या मोर्चाच्या पाश्वभूमीवर पालघर जिल्ह्यात सकल आदिवासी समाजाच्या वतीने विशाल मोर्चा काढण्याचे आवाहन केले.
तर आदिवासी हक्क आणि अधिकार जाणीव, जागृती करण्यासाठी समाज बांधवानी आधी आदिवासी बनायला शिकले पाहिजे. यासाठी आदिवासी संस्कृती, परंपरा टिकवून ठेवले पाहिजे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे अंत्यसंस्कार आदिवासी पद्धतीने केल्याचे उदाहरण देत आपण इतर समाजाचे अनुकरण थांबवावे असे आवाहन डॉ. सुनील पऱ्हाड यांनी केले. तर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध आयोगाकडे आदिवासी समाज आपले हक्क आणि अधिकारावर झालेल्या अन्यायची दाद मागण्यास उदासीन असल्याची खंत समितीच्या सदस्य वैदेही वाढाण यांनी व्यक्त केली.
सभेचे अध्यक्ष टीटीएस एफचे जिल्हाअध्यक्ष विलास बेलकर यांनी आदिवासी कर्मचारी आदिवासी चळवळीत मोठे योगदान देत असून कर्मचारी गृहीत धरले जाऊ नयेत असे त्यांनी सांगितले. त्यांचे योगदान दाखल घेण्याची गरज अधोरेखित झाली.विशेष म्हणजे रविवारी पालघर जिल्हा रेड अलर्ट असतानाही सफाळे (पूर्व) येथे पार पडलेली “आदिवासी हक्क व अधिकार विचार सभेला ठाणे, वाडा, तलासरी, विक्रमगड, डहाणू तालुक्यातून मोठ्या संख्येने आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.तुफान पावसातही हक्क अधिकार परिषदेत ठाम भूमिका घेणारा आदिवासी कार्यकर्ता शेवटपर्यंत राहिला.यावेळी ठाणे, तलासरी, डहाणू, वाडा, पालघर, सफाळे येथून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL