रत्नागिरी : पाचल पंचक्रोशी धनगर समाजाचा ३ ऑक्टोबरला दसरा सोहळा
रत्नागिरी, 29 सप्टेंबर, (हिं. स.) : राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी धनगर समाजाने आयोजित केलेला दसरा सोहळा येत्या शुक्रवारी, दि. ३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. पाचल पंचक्रोशी धनगर समाजातर्फे दसरा सोहळा यंदा भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आ
धनगर समाजाच्या दसरा मेळाव्याचे आवाहन


रत्नागिरी, 29 सप्टेंबर, (हिं. स.) : राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी धनगर समाजाने आयोजित केलेला दसरा सोहळा येत्या शुक्रवारी, दि. ३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

पाचल पंचक्रोशी धनगर समाजातर्फे दसरा सोहळा यंदा भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. समाजातील बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पारंपरिक संस्कृतीचा उत्सव एकत्र आणणारा हा सोहळा विशेष आकर्षण ठरणार आहे. पाचल येथे प्रभावती हॉलमध्ये सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.

धनगर समाजाचे पारंपरिक नृत्य फक्त समाजापुरते मर्यादित न ठेवता, ते लोककला म्हणून पुढे आणण्यासाठी आयोजक प्रयत्नशील आहेत. याचाच भाग म्हणून आवाजाचे बादशाह तुरेवाले देवेंद्र झिमन बुवा आणि शक्तिवाले शाहीर संजय जोशी बुवा यांच्यातील सामना रंगतदार ठरणार आहे. या सोहळ्यादरम्यान गजा नृत्य स्पर्धा, शक्ती-तुरा, हळदीकुंकू व पैठणी कार्यक्रम, अहिल्यामातेच्या लेकींचा सन्मान इत्यादी कार्यक्रमही होणार आहे.

या सोहळ्याला सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande