छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।पंतप्रधान .नरेंद्र मोदी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले..
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, जातवा येथे सामाजिक सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण व कचराकुंडी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी श्री.जितेंद्र बाबा जैस्वाल, श्री.सांडू अण्णा जाधव, मंडळ अध्यक्ष गोपाल वाघ, संजय त्रिभुवन, मनोहर एकसोनवणे, तानाजी पवार, कौतिक शिंदे, श्री.जगन ताडे, श्री.पंढरीनाथ देवरे, श्री.अण्णा पवार, श्री.गणेश पवार, कृष्णा सोटम, सरपंच इंदु बनकर यांची उपस्थिती लाभली.या कार्यक्रमाचे आयोजन श्री.जितेंद्र बाबा जैस्वाल यांच्या पुढाकाराने व भाजपा युवा मोर्चा मंडळाध्यक्ष श्री.रवी तानाजी पवार यांच्या सहकार्याने करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis