परभणी शहरात पावसामुळे बाधित कुटुंबांची पाहणी
परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। मागील दोन दिवसांपूर्वी परभणी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक झोपडपट्टी भागातील घरे पाण्यात बुडाली. यामुळे नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाथरी रोडवरील भारत नगर, शाहू नगर तसेच परिसरातील इत
परभणी शहरात पावसामुळे बाधित कुटुंबांची पाहणी


परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)।

मागील दोन दिवसांपूर्वी परभणी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक झोपडपट्टी भागातील घरे पाण्यात बुडाली. यामुळे नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाथरी रोडवरील भारत नगर, शाहू नगर तसेच परिसरातील इतर भागात घरामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर हानी झाली.

या परिस्थितीची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे यांनी स्वतः बाधित भागांची पाहणी केली. त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाला माहिती कळवून नुकसानग्रस्त कुटुंबांच्या मदतीची मागणी केली.

या अहवालाची दखल घेत आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी ग्राम महसूल अधिकारी गणेश गोरे, महसूल विभागातील कर्मचारी सूर्यकांत कदम, कमलाकर वायवळ, चक्रधर थोरात तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की, बाधित नागरिकांना लवकरच शासकीय नियमांनुसार आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल.

दरम्यान, गोरगरिबांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे प्रमोद कुटे यांचे कार्य स्थानिक नागरिकांकडून कौतुकास्पद ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande