छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज पैठण शहरातील आणि नाथ सागर प्रकल्पाची पाहणी केली. आज पैठण शहर व नाथसागर प्रकल्प परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली.यावेळी जायकवाडी धरणातून पाण्याचा प्रवाह वाढलेला असल्याने सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केले. ज्या शेतजमिनी व घरांमध्ये पाणी शिरले आहे, त्याचे तात्काळ पंचनामे करून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.नागरिकांचे सहकार्य व सावधगिरी हाच सुरक्षिततेचा मार्ग आहे. असे त्यांनी सांगितले.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis