पूरग्रस्तापर्यंत शासकीय मदत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची - जयकुमार गोरे
सोलापूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)मागील काही दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला महापूर येऊन 6 तालुक्यातील 92 गावांचे शेती,घरदारे,जनावरे तसेच गावातील सार्वजनिक सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. या सर्व बाधितांसाठी शासनाच्या व
Jay Kumar gore


सोलापूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)मागील काही दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला महापूर येऊन 6 तालुक्यातील 92 गावांचे शेती,घरदारे,जनावरे तसेच गावातील सार्वजनिक सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. या सर्व बाधितांसाठी शासनाच्या वतीने देण्यात येणारी सर्व प्रकारची मदत तसेच गावातील पाणी व वीज पुरवठा सुरळीत करणे,गावाची स्वच्छता करून रस्तेचीही तात्पुरती दुरुस्ती करणे ही सर्वस्वी जबाबदारी त्या त्या शासकीय यंत्रणेची असून ती अत्यंत गतीने पार पाडावी,असे आवाहन ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात पूर परिस्थिती च्या अनुषंगाने आयोजित सर्व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,महापालिका आयुक्त सचिन ओंबासे,पोलीस शहर आयुक्त एम.राजकुमार,मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील1 10 महसुली मंडळापैकी 76 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे तसेच 92गावांना पुराचा फटका बसलेला आहे. तरी प्रशासनाने ओला दुष्काळ लागू करण्याचे जे निकष आहेत त्याची माहिती घ्यावी व जिल्ह्यातील कोणत्या महसुली मंडळात हे निकष लागू होतात याबाबतची सविस्तर माहिती द्यावी. पूरग्रस्त भागात प्रत्येक लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याची जबाबदारी ही प्रशासकीय यंत्रणेची आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या आहाराप्रमाणे जेवण पुरवठा झाला पाहिजे असे त्यांनी सुचित केले.

जिल्ह्यातील पावसाची माहिती तसेच भीमा व सीना नदीत सध्या सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गाची माहिती घेऊन जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाने परस्परात योग्य समन्वय ठेवावा व पूर परिस्थिती येणार नाही याबाबत काळजी घ्यावी. पुरामध्ये गेलेल्या सर्व गावांच्या वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने तात्काळ सुरू करावा. जी 27 गावे पाण्यात आहेत त्या गावातील पाणी कमी झाल्यानंतर तेथील वीज पुरवठा सुरू करण्याचे नियोजन ठेवावे. पाणीपुरवठा विभागाने गावातील पाणी योजना सुरू करण्याचे अनुषंगाने नियोजन ठेवावे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग आणि त्यांच्याकडील झालेल्या रस्त्यांच्या नुकसानीचे माहिती घेऊन त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्याबाबत अत्यंत गतीने कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री श्री गोरे यांनी दिले.

पुराने बाधित गावातील स्वच्छतेला अधिक प्राधान्य द्यावे. गावातील रस्ते व लोकांची घरे चिखलाने माखलेली आहेत. ती स्वच्छ होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या यंत्रणे बरोबरच स्वच्छतेमध्ये काम करणाऱ्या संस्थेला काम द्यावे म्हणजे अधिक गतीने गावे स्वच्छ होण्यास मदत होईल. कामे करत असताना शासकीय यंत्रणा चे उपस्थितीमध्ये असली पाहिजे. तसेच 120 निवारा केंद्रातील जवळपास13हजार नागरिकांना रोजच्या रोज दोन वेळचे उत्कृष्ट जेवण मिळाले पाहिजे याबाबत प्रशासनाने अत्यंत दक्ष रहावे अशाही सूचना पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिल्या. ज्या विभागांना बाधित गावातील तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी त्यांच्या विभागाकडून निधी कमी पडत असेल तर जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande