खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी
पुणे, 29 सप्टेंबर (हिं.स.)खडकवासला धरण साखळीतील चार प्रमुख धरणे पाण्याने तुडुंब भरली आहेत. एकूण साठा २८.८९ टीएमसी म्हणजे ९९.११ टक्के इतका नोंदवला गेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने मुठा नदी पात्रामधील पाण्याचा विसर्ग टप्प्या
dam


पुणे, 29 सप्टेंबर (हिं.स.)खडकवासला धरण साखळीतील चार प्रमुख धरणे पाण्याने तुडुंब भरली आहेत. एकूण साठा २८.८९ टीएमसी म्हणजे ९९.११ टक्के इतका नोंदवला गेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने मुठा नदी पात्रामधील पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येत आहे.

सकाळी सहा वाजता खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात ६८८४ क्यूसेक पाणी सोडले जात होते. दुपारी दोन वाजता हा विसर्ग ४५१० क्यूसेक इतका कमी केला. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे दिलेल्या माहितीनुसार, आवश्यकतेनुसार विसर्गात कमी-जास्त बदल होऊ शकतात.

दरम्यान, वरसगाव धरणातून दुपारी एक वाजता वीजनिर्मिती गृहामार्फत ६०० क्यूसेक आणि सांडव्याद्वारे ५९७ क्यूसेक, असे मिळून एक हजार १९७ क्यूसेक विसर्ग करण्यात आला. तर पानशेत धरणातून वीजनिर्मिती गृहाद्वारे ६०० क्यूसेक व सांडव्याद्वारे ४९५ क्यूसेक, असा एकूण एक हजार ९५ क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला. टेमघर धरण शंभर टक्के भरले असले, तरी तेथून विसर्ग नाही. धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande