छ.संभाजीनगर - भाजपा आ. प्रशांत बंब यांच्याकडून पूरग्रस्त भागांची पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)खुलताबाद तालुक्यातील गोळेगांव, वेरूळमधील डम डम तलाव परिसर, मुब्बापूरवाडी परिसर व पळसवाडी शिवार येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले. त्या नुकसानीची खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आम
अ


छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)खुलताबाद तालुक्यातील गोळेगांव, वेरूळमधील डम डम तलाव परिसर, मुब्बापूरवाडी परिसर व पळसवाडी शिवार येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले. त्या नुकसानीची खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून, नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

नैसर्गिक आपत्तीच्या या संकटात शेतकरी बांधवांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. नदीजवळील खरडून गेलेली जमीन, वाहून गेलेले शेतीपूरक साहित्य, जनावरे तसेच पडझड झालेली घरे यांची तातडीने नोंद घेण्याचे निर्देश दिले आहेत.आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी त्वरित कार्यवाही केली जाईल. शेतकऱ्यांनी खचून न जाता आत्मविश्वास ठेवावा, कारण शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे.तसेच, तातडीने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांना तसेच देखील आवश्यक त्या सूचना दिल्या.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande