पालघर : नवरात्रीनिमित्त कुलस्वामिनी दर्शन यात्रा उत्साहात
पालघर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। सूर्यवंशी क्षत्रिय समाजामार्फत शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शनिवार, २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली एकदिवसीय कुलस्वामिनी दर्शन यात्रा उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाली. यात्रेसाठी पहाटे ६ वाजता सूर्यवंशी क्
सूर्यवंशी क्षत्रिय समाजाची नवरात्रीनिमित्त कुलस्वामिनी दर्शन यात्रा उत्साहात संपन्न


पालघर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। सूर्यवंशी क्षत्रिय समाजामार्फत शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शनिवार, २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली एकदिवसीय कुलस्वामिनी दर्शन यात्रा उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाली. यात्रेसाठी पहाटे ६ वाजता सूर्यवंशी क्षत्रिय सभागृह, दादर येथून बसने प्रस्थान करण्यात आले. दिवसभरात पालघर जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी माता (डहाणू), श्री संतोषी माता, श्री केवडावंती माता (डहाणू), श्री शितलादेवी माता (केळवे) व श्री कुर्लाई माता (सफाळे) या पाच देवींचे दर्शन घेण्यात आले. दरम्यान यात्रेकरूंसाठी सकाळी नाश्ता-चहा, दुपारी स्नेहभोजन व संध्याकाळी चहाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. महिलांनी देवीची ओटी, खण साहित्य नेल्यामुळे पूजा सोहळे सुरळीत पार पडले. संध्याकाळी ९ वाजता यात्रेचा समारोप झाला. भक्तिभावाने भरलेली ही यात्रा समाजातील बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अत्यंत उत्साहात अनुभवली. या यशस्वी यात्रेचे आयोजन व संयोजन आशिष पाटील, अभय महाले, प्रविण पाटील, अभय राऊळ, अभय ठाकूर, नविन पाटील, मनीष ठाकूर, महेश चोरघे, प्रदीप पाटील, मिलिंद राऊत, तुषार कोरे, तुषार चुरी आदींनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande