नवी दिल्ली, 29 सप्टेंबर (हिं.स.) : कॅनडाने लॉरेंस बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. भारतासोबतचे संबंध सुधारत असतानाच कॅनडाने हे पाऊल उचलले आहे. कॅनडा सरकारने हा निर्णय कंझर्व्हेटिव्ह आणि एनडीपी नेत्यांच्या मागणीनंतर घेतला आहे.
गेल्या वर्षी आरसीएमपी (रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस) यांनी असा आरोप केला होता की, बिश्नोई टोळी कॅनडामधील खलिस्तान समर्थकांना लक्ष्य करत आहे. मात्र भारताने हे आरोप फेटाळले होते.भारतासोबत संबंध सुधारण्याच्या पार्श्वभूमीवरच कॅनडाने हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. कंझर्व्हेटिव्ह आणि एनडीपी नेत्यांच्या दबावानंतर हा ठराव झाला.
आरसीएमपीच्या म्हणण्यानुसार, भारत बिश्नोई टोळीचा वापर कॅनडामधील लोकांवर विशेषतः खलिस्तान या वेगळ्या शीख राष्ट्राची मागणी करणाऱ्यांवर हल्ले करण्यासाठी, खून करण्यासाठी आणि खंडणी वसूल करण्यासाठी करत होता. तथापि, भारत सरकारने या सर्व आरोपांचा स्पष्टपणे इन्कार केला आहे आणि सांगितले आहे की ओटावा सरकारसोबत मिळून ही टोळी रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे.द कॅनेडियन प्रेसनुसार, सेंटर फॉर इंटरनॅशनल गव्हर्नन्स इनोव्हेशनचे वरिष्ठ फेलो वेस्ली वॉर्क यांनी पूर्वी म्हटले होते की, या टोळीला दहशतवादी यादीत टाकल्याने फारसा फरक पडणार नाही, कारण कॅनडाची मुख्य समस्या म्हणजे गुन्हेगारी गुप्त माहिती गोळा करण्याची मर्यादित क्षमता होय.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी