जनतेला आधार देण्याचे काम मांजरा परिवाराच्या वतीने निश्चितपणे केले जाईल - अमित देशमुख
लातूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। यावर्षी आसमानी संकटामुळे लातूर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनता संकटात असल्याचे नमूद करून या जनतेला आधार देण्याचे काम मांजरा परिवाराच्या वतीने निश्चितपणे केले जाईल अशी ग्वाही कारखान्याचेसंस्थापक अध्यक्ष आमदार अमित
अ


लातूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। यावर्षी आसमानी संकटामुळे लातूर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनता संकटात असल्याचे नमूद करून या जनतेला आधार देण्याचे काम मांजरा परिवाराच्या वतीने निश्चितपणे केले जाईल अशी ग्वाही कारखान्याचेसंस्थापक अध्यक्ष आमदार अमित देशमुख यांनी आज दिली.

लातूर तालुक्यातील निवळी येथिल विलास सहकारी साखर कारखानाच्या लातूर येथे आयोजित २३ व्या सर्वसाधारण सभेपुर्वी, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. लातूरचे खासदार,. डॉ. शिवाजी काळगे, कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख, उपाध्यक्ष माजी आमदार श्री. वैजनाथदादा शिंदे व सहकार क्षेत्रातील इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी मांजरा कारखान्याची उभारणी केली. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून माजी मंत्री, सहकार महर्षी, दिलीपराव देशमुख स यांच्या मार्गदर्शनाखाली, मांजरा परिवार आता विस्तारला असून, या परिवारातील सर्वच साखर प्राण्यांची यशस्वीरित्या वाटचाल सुरू असल्याचे यावेळी सांगितले.

मांजरा परिवारातील विलास कारखान्यासह सर्वच साखर कारखान्यानी आजवर शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी भाव दिला आहे, त्यामुळे ग्रामीण भागात परिवर्तन घडवून तेथील जनतेचे जीवनमान उंचावले आहे. आगामी गळीत हंगामात आदरणीय श्री. दिलीपराव देशमुख यांनी या परिवारामार्फत गाळप ऊसाला प्रति टन ३१५० रुपये भाव देण्याचा संकल्प बोलून दाखवला आहे. या संकल्पची निश्चितपणाने परिपूर्ती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे आश्वासनही यावेळी दिले. ऊसतोड यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून मांजरा परिवारातील कारखान्यांनी मिळून १० हजार तरुणांच्या हाताला काम दिले असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. भविष्यकाळात या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कारखान्याच्या माध्यमातून अनेक प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचेही सांगितले.

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी, नदी-नाल्यांना आलेला पूर यामुळे ३ ते ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, शेतकरी शेतमजूर आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचे या संकटामुळे कंबरडे मोडले आहे, या परिस्थितीत शासनाने जनतेला खंबीर आधार देण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी नमूद केले.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने आवश्यक तेवढी जास्तीत जास्त मदत द्यावी त्याचबरोबर, विमा कंपन्यांनी सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा भरपाई द्यावी अशी मागणी ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande