परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र कार्यालयातील सततच्या गैरव्यवस्था, नागरिकांना होणारी हिंडसाण व त्रासदायक कारभार या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.
नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारीनुसार, कार्यालयीन वेळेतच दरवाजे बंद ठेवणे, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वारंवार फेऱ्या मारायला लावणे, कामात होणारी अनावश्यक टाळाटाळ या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या सर्व विषयांचा जाब विचारण्यासाठी जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान शहर उपाध्यक्ष खंडू राऊत, महाराष्ट्र सैनिक आनंद शिंदे, विशाल गरुड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis