परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका तथा भारतीय जनता पार्टीचे नेत्या प्रेरणा समशेर वरपूडकर यांनी तालुक्यातील मोहळा, भिसेगाव, खडका, कान्हेगाव, कोरटेक येथील अतिवृष्टीने बाधित भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
अतिवृष्टीने जिल्हाभरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हाताशी आलेल्या पिकाचे पूर्णतः नुकसान झाले आहे. शेतजमीन खरडून जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले आहेत असे नमूद करीत . या संकट काळात शेतकऱ्यांनी धीर धरावा,सरकारद्वारेही शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळावी या दृष्टीने निश्चित पाठपुरावा केला जाईल असे ठोस आश्वासन दिले यावेळी प्रा.मुंजा धोंडगे, यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis