नांदेड, 29 सप्टेंबर (हिं.स.)।नांदेड जिल्ह्यात विशेषतः ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे. मुखेड कंधार विधानसभा क्षेत्रासह जिल्हाभरात देखील अतिवृष्टीमुळे मोठा प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. आठ आठ दिवसाच्या फरकाने पुन्हा पुन्हा अतिवृष्टी झाल्यामुळे लेंडी, मन्याड, गोदावरी नदीला पुर आल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. रस्ते वाहून गेली आहेत अशी माहिती देत पंजाब सरकार प्रमाणे तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी, त्यानंतर पंचनामे करून नुकसानभरपाई प्रमाणे विशेष मदत द्यावी, घराची पडझड असो की पाणी शिरलेले असो, पशुधनाचे नुकसान असो, जिवीतहानी असो यासाठी विशिष्ट वेगळी मदत देखील व्हावी, पीकविमा तात्काळ देण्यात यावा तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यातील अतिवृष्टीचा फटका आधी मुखेड कंधार विधानसभा क्षेत्रात बसला दरम्यान ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात आठ दहा दिवसांच्या फरकाने पुन्हा पुन्हा जिल्हाभरात अतिवृष्टी झाली. यामुळे लेंडी, मन्याड, गोदावरी आदी नद्यांना पुर आला यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदीकाठच्या गावांना फटका बसला, घरांची पडझड झाली, अनेक घरांमध्ये पाणी शिरले, शेकडो गुरेढोरे वाहून गेले, काही दगावली देखील आहेत. पुन्हा पुन्हा झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी जनजीवन विस्कळीत झाले आहे. बळीराजा मेटाकुटीला आला आहे. अतिवृष्टीच्या या परिस्थितीचा आढावा काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी प्रत्यक्ष पहाणी करून घेत शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती पुर्वपदावर येण्यासाठी चारपाच वर्ष लागतील येवढे शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंजाब सरकार प्रमाणे हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी. शेकडो गावातील घरांची पडझड झाली आहे अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे तातडीने मदत व्हावी, अनेकांची गुरेढोरे, कोंबड्या आदी वाहून गेल्या तर अनेक ठिकाणी दगावली देखील आहेत. त्यामुळे विशेष नुकसान भरपाई तातडीने द्यायला हवी आहे. पीकविमा तात्काळ द्यावा. ओला दुष्काळ जाहीर करा, असे ते म्हणाले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी जिल्ह्यातील अनेक गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन अतिवृष्टीचा आढावा घेतला आहे. सतत प्रशासनाच्या संपर्कात राहून योग्य पंचनाम्याची मागणी त्यांनी वेळोवेळी केली आहे. दरम्यान हेक्टरी पन्नास हजार तातडीने मदत द्यावी, पीकविमा तातडीने द्यावा व घरांची पडझड असो, पीकांचे नुकसान असो, पशुधनाचे नुकसान असो यासाठी वेगळ्या विशेष मदतीची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis