परभणीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत एक तास एक साथ स्वच्छोत्सव श्रमदान मोहीम राबविली
परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर यांच्या संकल्पनेतून तसेच उपायुक्त बबन तडवी, सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे व विभाग प्रमुख मिर्झा तन्वीर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान
परभणीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत एक तास एक साथ स्वच्छोत्सव श्रमदान मोहीम राबविली


परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)।

आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर यांच्या संकल्पनेतून तसेच उपायुक्त बबन तडवी, सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे व विभाग प्रमुख मिर्झा तन्वीर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत स्वच्छता ही सेवा 2025 या उपक्रमाचा एक भाग म्हणून एक तास एक साथ स्वच्छोत्सव श्रमदान मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली.

ही मोहीम प्रभाग क्रमांक 8 मधील गांधी पार्क मार्केट परिसरात राबविण्यात आली. शासनाच्या सूचनांनुसार या उपक्रमाद्वारे श्रमदान करण्यात आले तसेच उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली. या निमित्ताने परिसरात स्वच्छता करून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी प्रभाग समिती 'ब' चे सहाय्यक आयुक्त आवेज हाश्मी, मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड, शहर समन्वयक तूराब खान, स्वच्छता निरीक्षक न्यायरत्न घुगे तसेच प्रभाग समिती 'ब' च्या कार्यालयातील कर्मचारी किशन देशमुख, अनिल देशमुख, कैलास ठाकूर, गणेश काकडे, जलील भाई, सौरभ सूर्यवंशी, मुकादम दत्ता गवाले, शेख मुख्तार, तोहिद खान आणि स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे नागरिकांनी स्वच्छतेबाबत जागरूक राहावे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावावी, तसेच शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास प्रशासनासोबत हातभार लावावा, असा संदेश देण्यात आला.

महानगरपालिकेच्या या प्रयत्नाचे नागरिकांनी कौतुक केले असून, अशा उपक्रमांमुळे शहर स्वच्छ, निरोगी आणि पर्यावरणपूरक होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande