पुणे, 29 सप्टेंबर (हिं.स.) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) २९ सेवांपैकी १९ सेवा ऑनलाइन देण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांना आता या सेवा घरबसल्या मिळणार आहेत.येत्या काही दिवसांत उर्वरित सेवा देखील ऑनलाइन करण्यात येणार असून त्यांची प्रकिया सुरू करण्यात आली असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. प्राधिकरणाने सुरू केलेल्या या ऑनलाइन सेवांची माहिती अर्जदारांनी आपल्या ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर कळविण्यात येणाप आहे.
बांधकाम विकास परवानगी विभाग : इमारत बांधकाम परवानगी, जोते मोजणी प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, झोन दाखला, भाग नकाशा अथवा नकाशा देणे, सुधारित बांधकाम परवानगी, तात्पुरते रेखांकन परवानगी, सुधारित तात्पुरते रेखांकन, अंतिम रेखांकन परवानगी, नूतनीकरण परवानगी, भागश: भोगवटा प्रमाणपत्र, साइट एलेवेशन प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यात येणार आहे.विविध परवाने : अभियंता परवाना, स्ट्रक्चरल इंजिनिअर परवाना, सुपरवायझर परवाना, नगर रचनाकार परवाना, आकाशचिन्ह परवाना, आकाशचिन्ह नियमितीकरण परवाना, विकासाची उद्दिष्टे प्रमाणपत्राची (आयओडी) सेवा मात्र ऑफलाइन देण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु