परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)।
अनेक दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढलेल्या मौजे अंगलगावातील सुमारे 50 मजूर कुटुंबांना तहसील कार्यालय, परभणी व श्री बालाजी गणेश मंडळ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
पूरस्थितीमुळे मजुरीसाठी बाहेर जाऊ न शकलेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. यामुळे प्रशासन व मंडळाच्यावतीने साखर 1 किलो, पीठ 5 किलो, तांदूळ 1 किलो, तेल पाकीट, तूर डाळ 500 ग्रॅम, मीठ पाकीट, हळद, तिखट, मसाला, चहा पावडर, बिस्कीट, खोबरेल तेल, दंतमंजन व डिटर्जन पावडर अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप पुरग्रस्तांना करण्यात आले.
मदत मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व प्रशासन तसेच श्री बालाजी गणेश मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis