नाशिक : हत्या प्रकरणातील आरोपीची काढली धिंड
नाशिक, 29 सप्टेंबर (हिं.स.) : श्रमिक नगर भागात तीन दिवसांपूर्वी गाडी साईटला घेण्याच्या कारणावरून टोळक्याने चाकूने वार करून एका 23 वर्षाच्या युवकाचा खून केला होता. या खून प्रकरणातील आरोपींची आज सातपूर पोलिसांनी धिंड काढली. या प्रकरणात काही अल्पवयीन
नाशिक : हत्या प्रकरणातील आरोपीची काढली धिंड


नाशिक, 29 सप्टेंबर (हिं.स.) : श्रमिक नगर भागात तीन दिवसांपूर्वी गाडी साईटला घेण्याच्या कारणावरून टोळक्याने चाकूने वार करून एका 23 वर्षाच्या युवकाचा खून केला होता. या खून प्रकरणातील आरोपींची आज सातपूर पोलिसांनी धिंड काढली. या प्रकरणात काही अल्पवयीन तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना पोलिसांनी लागलीच अटक केली होती. बागलाण तालुक्यातील असलेला हा युवक भाडे तत्वावर खोली घेऊन श्रमीकनगर येथे मित्रांसोबत राहत होता. कामावरून घरी परतत असतानाच गाडी नीट चालवता येत नाही का ?या कारणावरून त्याच्यावर वार केले होते. यात त्याचा हकनाक बळी गेला होता. आरोपींना पकडल्यानंतर नागरिकांमधील गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी, यासाठी नागरिकांनी आरोपींची धिंड काढण्याची मागणी बैठका घेऊन सातपूर पोलिसांकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आठ जणांची सातपूर पोलिसांनी श्रमिक नगर परिसरातून धिंड काढली. त्यांना पोलिसी प्रसाद देखील दिला. या वेळी दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस पथकाचे डीबी पथक तसेच कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande