पुणे पालिकेतर्फे सीएचएस योजनेंतर्गत दीड वर्षात २६ हजार नागरिकांवर उपचार
पुणे, 29 सप्टेंबर (हिं.स.)। शहरी गरीब आणि अंशदायी वैद्यकीय साहाय्य (सीएचएस) या आरोग्य योजनेमुळे दीड वर्षात २६ हजार नागरिकांना उपचार मिळाले आहेत. महापालिकेने यासाठी १६८ कोटी रुपये खर्च केले असून, प्रत्येक लाभार्थीवर सरासरी ६४ हजार ६१५ रुपये खर्च झाला.
PMC news


पुणे, 29 सप्टेंबर (हिं.स.)। शहरी गरीब आणि अंशदायी वैद्यकीय साहाय्य (सीएचएस) या आरोग्य योजनेमुळे दीड वर्षात २६ हजार नागरिकांना उपचार मिळाले आहेत. महापालिकेने यासाठी १६८ कोटी रुपये खर्च केले असून, प्रत्येक लाभार्थीवर सरासरी ६४ हजार ६१५ रुपये खर्च झाला. या योजनेमुळे सर्वसामान्य गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे.महापालिकेने ‘सीएचएस’ योजना १९६७ मध्ये सुरू केली तर शहरी गरीब योजना २०११ ला सुरू झाली. अलीकडे या योजनांमध्‍ये लाभार्थींची संख्‍या वाढत असल्‍याने दरवर्षी या योजनेचा खर्चही वाढत आहे.

दरवर्षी या योजनेवर सरासरी १०० कोटी रुपयांचा खर्च होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यांत रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.खासगी रुग्‍णालयांमधील उपचारांचे दर गगनाला भिडलेले आहेत. ते सर्वसामान्‍यांच्‍या आवाक्‍यात राहिलेले नाहीत. दरवर्षी वैद्यकीय महागाई (मेडिकल इन्‍फलेशन) १५ ते १८ टक्‍क्‍यांनी वाढत आहे. त्‍यामुळे लाखो रुपयांचा खर्च सर्वसामान्‍यांना खिशातून करावा लागतो. त्‍यामध्‍ये शहरी-गरीब योजनेचा लाभ हा सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळतो. म्‍हणून योजनेत दरवर्षी लाभार्थी संख्‍या वाढत असल्‍याने आरोग्‍य विभागाला पुरवणी खर्चाद्वारे तो भागवावा लागतो. या योजनेद्वारे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना शस्त्रक्रिया, तपासण्या, औषधे आणि आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande