नाशिक जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीचे आरक्षण घोषित
नाशिक, 29 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील पंचायत समित्यांसाठी सभापती पद आरक्षणाची घोषणा सोमवारी करण्यात आली त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासनाने एक पाऊल अजून पुढे टाकले आहे. मागील काही दिवसापासून सतत त्याने अनिश्चितता असलेल्या
नाशिक जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीचे आरक्षण घोषित


नाशिक, 29 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील पंचायत समित्यांसाठी सभापती पद आरक्षणाची घोषणा सोमवारी करण्यात आली त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासनाने एक पाऊल अजून पुढे टाकले आहे.

मागील काही दिवसापासून सतत त्याने अनिश्चितता असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी आता प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे ३० जानेवारी २०२६. पर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे त्या दृष्टिकोनातून आज जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार पंचायत समिती सभापतीचे आरक्षण सोडत घोषित केलीयामध्ये सर्वसाधारण (खुले) १ तर सर्वसाधारण महिला १, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता २ तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला २ सभापतीपद आरक्षित झाले आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार सभापतीपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 15 पंचायत समितीनिहाय आरक्षणात

अनुसूचित जमाती – कळवण, अनुसूचित जमाती – सुरगाणा, अनुसूचित जमाती स्त्री – पेठ अनुसूचित जमाती स्त्री – त्र्यंबकेश्वर, अनुसूचित जमाती स्त्री – दिंडोरी, अनुसूचित जाती स्त्री – इगतपुरी, अनुसूचित जमाती – निफाड, अनुसूचित जमाती – नाशिक, अनुसूचित जमाती स्त्री – मालेगाव, नागरिकांचा मागास प्रवर्ग – बागलाण, नागरिकांचा मागास प्रवर्ग – येवला, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री- देवळा, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री – चांदवड , सर्वसाधारण गट – सिन्नर, सर्वसाधारण स्त्री – नांदगाव

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande