छ.संभाजीनगर एसपी कार्यालय आयोजित राज्यस्तरीय सप्तरंग रिल्स स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा
छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय आयोजित राज्यस्तरीय सप्तरंग रिल्स स्पर्धा 2025 पारितोषिक वितरण सोहळा आज संपन्न झाला. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सोहळ्याला उपस्
अ


छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय आयोजित राज्यस्तरीय सप्तरंग रिल्स स्पर्धा 2025 पारितोषिक वितरण सोहळा आज संपन्न झाला. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सोहळ्याला उपस्थित राहून पारितोषिक वितरण केले

या विशेष सोहळ्यात नशामुक्ती, न्याय हक्क, सायबर क्राईम, सोशल क्राईम, महिला सशक्तिकरण तसेच अमली पदार्थ व इतर व्यसनांचे दुष्परिणाम अशा महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांवर तयार केलेले सुंदर व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले.

जनजागृती अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला कायद्याची माहिती व सामाजिक समस्यांबाबत जागरूक करण्याचे ग्रामीण पोलीस दलाचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे. असे त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande