नाशिक : मंगळवारी रंगणार स्वराज फाउंडेशनचा अवयव दान जागर व दांडीया उत्सव
नाशिक, 29 सप्टेंबर (हिं.स.)।उद्या 30 तारीख रोजी संध्याकाळी 7:00 वाजता नंदनवन लॉन्स येथे स्वराज फाउंडेशनच्या दांडीया उत्सव व अवयव दानाचा जागर हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती संस्थापक आकाश छाजेड यांनी दिली. स्वराज फाउंडेशनच्या दांडी उत्सवाच
नाशिक : मंगळवारी रंगणार स्वराज फाउंडेशनचा अवयव दान जागर व दांडीया उत्सव


नाशिक, 29 सप्टेंबर (हिं.स.)।उद्या 30 तारीख रोजी संध्याकाळी 7:00 वाजता नंदनवन लॉन्स येथे स्वराज फाउंडेशनच्या दांडीया उत्सव व अवयव दानाचा जागर हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती संस्थापक आकाश छाजेड यांनी दिली.

स्वराज फाउंडेशनच्या दांडी उत्सवाचे 27 व वर्ष असून स्वराज फाउंडेशनच्या माध्यमातून अवयव दानाची जनजागृती यानिमित्त करण्यात येणार आहे.

स्वराज फाउंडेशन समवेत स्वामीराज ग्रुप, एन एस यु आय, अशा विविध संस्थांचा हा कार्यक्रम आहे.

दरवर्षीप्रमाणे स्वराज फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व प्राविण्य मिळवलेल्या महिलांचा स्वराज तेजस्विनी सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात असल्या येणार असल्याची माहिती आकाश छाजेड व अल्तमश शेख यांनी दिली आहे.

नाशिककरांनी या अवयव दान जागर व दांडिया उत्सवाला उपस्थित राहावे असे आव्हान स्वराज फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वराज तेजस्विनी सन्मान पुरस्कार यावर्षी नगरसेविका हिमगौरी अडके, सायली पालखेडकर, शरण्या शेट्टी, डॉक्टर गांगुर्डे, शितल भंडारे, दिलपरीत कौर, प्रतिभा चौधरी, रेखा कातकाडे, सारिका जेफ, रुकसार शेख, डॉ. सोनाली कालगुडे, सुषमा विशाल, या महिलांना देण्यात येणार असल्याची ही माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. सदरचे पुरस्कार विविध मान्यवरांच्या हस्ते नंदनवन लॉन्स येथे प्रदान करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande