नवी दिल्ली, 29 सप्टेंबर (हिं.स.) - तामिळनाडूच्या करूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच जखमींना लवकर बरे वाटावेे, यासाठी प्रार्थनाही केली आहे. दरम्यान नड्डा यांनी सदर दुर्घटनेमागील कारणे जाणून घेण्यासाठी भाजपा खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वात आठ खासदारांची चौकशी समिती स्थापन केली आहे. यात अनुराग ठाकूर, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, तेजस्वी सूर्या, ब्रज लाल (माजी पोलीस महासंचालक), अपराजिता सारंगी, रेखा शर्मा आणि पुत्ता महेश कुमार यांचा समावेश आहे. एनडीए खासदारांचे हे शिष्टमंडळ करूरला भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांचीही भेट घेणार आहे. तसेच चौकशीनंतर अहवालही सादर करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी