व्यापक जनहितासाठी माहिती अधिकार कायद्याचा वापर : संदीप सावंत
नाशिक, 29 सप्टेंबर (हिं.स.)।सर्वसामान्य नागरिकाला लोकशाही व्यवस्थेत माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी माहिती अधिकार हा महत्वाचा अधिकार मिळाला. सार्वजनिक जनहिताच्या बाबींवर एकप्रकारे अंकुश ठेवण्याचे काम यामार्फत होत आहे. त्यामुळे प्रशासनातही पारदर्शकता ये
व्यापक जनहितासाठी माहिती अधिकार कायद्याचा वापर : संदीप सावंत


नाशिक, 29 सप्टेंबर (हिं.स.)।सर्वसामान्य नागरिकाला लोकशाही व्यवस्थेत माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी माहिती अधिकार हा महत्वाचा अधिकार मिळाला. सार्वजनिक जनहिताच्या बाबींवर एकप्रकारे अंकुश ठेवण्याचे काम यामार्फत होत आहे. त्यामुळे प्रशासनातही पारदर्शकता येण्यास मदत झाली असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा) येथील माहिती अधिकार व्याख्याते व प्रशिक्षक संदीप सावंत यांनी केले.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अप्पर आयुक्त (सामान्य प्रशासन) अरविंद लोखंडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी सहायक आयुक्त (भूसुधार) विठ्ठल सोनवणे, सहायक आयुक्त (विकास) मनोजकुमार चौधर, तहसीलदार (सामान्य प्रशासन) पल्लवी जगताप यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील विविध अधिकारी-कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना श्री. सावंत म्हणाले की, माहिती अधिकारी कायद्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली आहे. या कायद्याची शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी मनात भीती न बाळगता त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. माहिती अधिकार हा देशाच्या नागरिकाला मिळालेला अधिकार आहे. कोणत्याही कार्यालयाने अर्जदाराने मागितलेली माहिती जशी असेल तशी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. माहिती तयार करुन देणे अपेक्षित नसल्याचे त्यांनी सांगितले.

अपर आयुक्त श्री. लोखंडे यांनी प्रास्ताविकात माहिती अधिकार दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला. दिनांक 20 सप्टेंबर, 2008 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य पातळीवर दिनांक 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. तथापि, सन 2025 चा माहिती अधिकार दिन हा शासकीय सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी येत आहे.त्यामुळे या वर्षी दि. 29 सप्टेंबर, 2025 रोजी “माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande