लातूर : विलास सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
लातूर, 29 सप्टेंबर (हिं.स.) : विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज लातूर शहरातील हॉटेल वैष्णव येथे कारखाना अधिमंडळाच्या 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली खासदार डॉ. शिवाजी काळगे, कारखान्याच
Q


लातूर, 29 सप्टेंबर (हिं.स.) : विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज लातूर शहरातील हॉटेल वैष्णव येथे कारखाना अधिमंडळाच्या 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली खासदार डॉ. शिवाजी काळगे, कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. वैजनाथदादा देशमुख व जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह उपस्थित राहिलो. विलासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखाना आणि या परिवारातील विलास सहकारी साखर कारखान्यासह सर्वच कारखान्यांनी मागच्या ४० वर्षात ग्रामीण जनतेला आधार देण्याचे काम केले आहे असे सांगून आगामी ४० वर्षातही या परिवाराचे लोकसेवेचे कार्य मागच्या वाटचालीपेक्षा आणखीन अधिक उज्वल राहील अशी ग्वाही याप्रसंगी बोलताना दिली. अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण सहकार्यांना सोबत घेऊन या कारखान्याची उभारणी केली. कारखान्याच्या उभारणीपासूनच सर्व क्षेत्रात विक्रम प्रस्थापित करून, शेतकरी सभासदांच्या उसाला अधिकाधिक भाव देण्याचा प्रयत्न केला आहे. या कारखान्यात आता इथेनॉल निर्मिती, वीजनिर्मिती होत असून आगामी काळात कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे, यासोबतच इतर अनेक प्रकल्पही येथे सुरू करून, शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ देण्याचा प्रयत्न राहणार आहे. मांजरा परिवाराने ऊस तोडणी यांत्रिकीकरणाला सुरुवात केली आहे, या माध्यमातून आजपर्यंत शेतकऱ्यांच्या १० हजार मुलांना प्रतिष्ठेचा रोजगार उपलब्ध झाला आहे, आगामी काळात एआय सारखे तंत्रज्ञान वापरून ग्रामीण जीवनात क्रांती घडवण्याचा विचार असल्याचेही यावेळी सांगितले.----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande