परभणी, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणी साठा धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने सर्व १६ दरवाजातून ३ लाख ८१ हजार ५१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.सध्या धरणातील पाण्याची पातळी ३९८.९० मीटर असून, ती पूर्ण क्षमतेपेक्षा (FRL – ३९४.२० मीटर) जास्त आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने तब्बल १०८०३.२७ क्युमेक (सुमारे ३,८१,५१३ क्युसेक) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, अनावश्यक हालचाल करू नये व सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis