अकोला : दिव्यांगांच्या बचत गटांना साधन खरेदीसाठी अर्थसाह्य
अकोला, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। जि. प. दिव्यांग कल्याण विभागाचा ५ टक्के दिव्यांग निधी व जि.प. उपकर ५ टक्के निधीतून दिव्यांगांच्या बचत गटांना साधन खरेदीसाठी अर्थसाह्य देण्यात येणार आहे. त्यात दिव्यांगाच्या बचत गटांना ९० टक्के अनुदानावर एलईडी लाईट बनविण
अकोला : दिव्यांगांच्या बचत गटांना साधन खरेदीसाठी अर्थसाह्य


अकोला, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। जि. प. दिव्यांग कल्याण विभागाचा ५ टक्के दिव्यांग निधी व जि.प. उपकर ५ टक्के निधीतून दिव्यांगांच्या बचत गटांना साधन खरेदीसाठी अर्थसाह्य देण्यात येणार आहे.

त्यात दिव्यांगाच्या बचत गटांना ९० टक्के अनुदानावर एलईडी लाईट बनविण्यासाठी अर्थसाह्य देण्यात येईल. त्याचप्रमाणे, दिव्यांगांच्या बचत गटांना ९० टक्के अनुदानावर केरसुणी, झाडु व खराटा तयार करण्यासाठी अर्थसाह्य, उदबत्ती उत्पादित करण्यासाठी अर्थसहाय्य, तसेच लाडु निर्माण करण्याचे यंत्र घेण्यासाठी अर्थसाह्य देण्यात येणार आहे. या सगळ्या बाबींसाठी ९० टक्के अनुदान देय आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दि. १० ऑक्टोबरपर्यंत संबंधित पंचायत समिती कार्यालयात आवश्यक दस्तऐवज जोडून करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांगांना लाभ होण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande