अकोला रेल्वे स्थानकावर दिव्यांग महिलांचा 'स्वच्छता संवाद'
अकोला, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। ''स्वच्छता ही सेवा - 2025'' या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत, अकोला रेल्वे स्थानकावर केशव दिव्यांग महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने एक लक्षवेधी स्वच्छता जनजागृती कार्यक्रम पार पडला. दिव्यांग महिलांच्या उत्स्फूर्त
P


अकोला, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। 'स्वच्छता ही सेवा - 2025' या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत, अकोला रेल्वे स्थानकावर केशव दिव्यांग महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने एक लक्षवेधी स्वच्छता जनजागृती कार्यक्रम पार पडला. दिव्यांग महिलांच्या उत्स्फूर्त उत्साहामुळे आणि अनोख्या सादरीकरणामुळे या रॅलीने प्रवाशांचे लक्ष वेधले.

संस्थेच्या महिलांनी प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांना प्लॅटफॉर्म आणि रेल्वेतील प्रवाशांना स्वच्छता राखण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच, ट्रेनमधील बायोटॉयलेटचा योग्य आणि स्वच्छ वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. या रॅलीचे सर्वात विशेष आकर्षण म्हणजे, महात्मा गांधीजींची वेशभूषा साकारणारा एक मूकबधिर बालक यामध्ये सहभागी झाला होता. दिव्यांग महिलांचा उत्साह आणि या बालकाचे सादरीकरण पाहून उपस्थित प्रवाशांनी त्याचे मोठे कौतुक केले आणि रॅलीमध्ये रस घेतला.

या प्रभावी कार्यक्रमात केशव दिव्यांग महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा खेडकर आणि त्यांच्या टीमने सक्रिय सहभाग घेतला. रेल्वे प्रशासनाकडून स्टेशन प्रबंधक संतोष डी. कवडे, आरोग्य निरीक्षक शिव कुमार माली, CSCI निकम आणि हाऊसकीपिंग स्टाफ उपस्थित होते. या सामूहिक प्रयत्नातून 'स्वच्छता ही सेवा' हा संदेश अधिक प्रभावीपणे प्रवाशांपर्यंत पोहोचला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande