जळगाव - अतिवृष्टीग्रस्तांना त्वरित भरपाई देण्याच्या मागणीसाठी माकपचे आंदोलन
जळगाव, 30 सप्टेंबर, (हिं.स.) - मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, कामगार आणि घरकामगार यांना झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानाची त्वरित भरपाई करण्याची मागणी करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) जळगाव जिल्हा समितीने मंगळवारी, दि. ३० सप्टेंबर
जळगाव - अतिवृष्टीग्रस्तांना त्वरित भरपाई देण्याच्या मागणीसाठी माकपचे आंदोलन


जळगाव, 30 सप्टेंबर, (हिं.स.) - मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, कामगार आणि घरकामगार यांना झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानाची त्वरित भरपाई करण्याची मागणी करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) जळगाव जिल्हा समितीने मंगळवारी, दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन केले. यावेळी शेतकरी, शेतमजूर, घरकामगार आणि बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर करून जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार वर्गाला भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले.

निवेदनात म्हटले आहे की, जोरदार पावसामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली किंवा दगावली आहेत, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. माकपच्या मागणीनुसार, राज्य शासनाने तातडीने पंचनाम्याचे काम पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, तसेच घर आणि जनावरांचे नुकसान झालेल्या लोकांना त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. आंदोलकांनी सरकारच्या दिरंगाईवर तीव्र संताप व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande