सोलापूर - 'बार्शी-परंडा रस्त्यावरून पिकअपमधून ३० जनावरांची सुटका
सोलापूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। बार्शी-परंडा रस्त्यावरून पिकअपमधून कत्तलीसाठी जनावरे जात असल्याची माहिती समजताच पोलिसांसह गोरक्षकांनी सापळा रचून टेम्पो अडवला. त्यात ३० जर्सी गायीची वासरे, एक म्हशीचे रेडकू तर ४ वासरे मृतावस्थेत आढळले. टेम्पो चालक, त्या
सोलापूर - 'बार्शी-परंडा रस्त्यावरून पिकअपमधून ३० जनावरांची सुटका


सोलापूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। बार्शी-परंडा रस्त्यावरून पिकअपमधून कत्तलीसाठी जनावरे जात असल्याची माहिती समजताच पोलिसांसह गोरक्षकांनी सापळा रचून टेम्पो अडवला. त्यात ३० जर्सी गायीची वासरे, एक म्हशीचे रेडकू तर ४ वासरे मृतावस्थेत आढळले. टेम्पो चालक, त्याच्या साथीदारावर बार्शी तालुका ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पिकअप (एम.एच.४२ एम ४९०१) चालक व साथीदारावर गुन्हा दाखल झाला. पोलिस राहुल बोंदर यांनी फिर्याद दाखल केली. पिकअपमधून जनावरे परंड्याच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस व गोरक्षक सुमित नवले, खंडू जाधव, किशोर आकसकर, समर्थ तुपे हिंगणगाव पाटीजवळ थांबले. चालकासह साथीदारांना संशय आल्याने त्यांनी टेम्पो हिंगणगाव फाट्यावरून आतमध्ये नेला. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande