नवी दिल्ली, 30 सप्टेंबर (हिं.स.) : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तावर सैन्य कारवाईचा विचार करत होता. परंतु, आंतरराष्ट्रीय मुख्यत्वे अमेरिकेच्या दबावात हा विचार बारगळल्याचा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केलाय.
एका मुलाखतीत चिदंबरम म्हणाले की, मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये देखील सैन्य कारवाईचा विचार करीत होते. संपूर्ण जग भारताला युद्ध सुरू करू नका असे सांगत होते. यात अमेरिकेच्या तत्कालिन सेक्रेटरी कॉन्डोलीझा राईस यांचा देखील समावेश होता. परंतु परराष्ट्र खात्याचे मत व आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करुन शेवटी युद्ध टाळले गेले. अमेरिकेच्या कॉन्डोलीझा राईस आम्हाला म्हणाल्या की, कृपया युद्ध सुरू करू नका. माझ्या मनात पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यावे असे होते, पण निर्णय सरकारनं एकत्र घेऊ असा मी सांगितला. त्यांनी यावेळी पंतप्रधानांच्या समवेतही या विषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले.
चिदंबरम यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चीड ऐनवेळी वाढत असल्याचे दिसते. सरकार विरुद्ध विरोधकांमध्ये 26/11 नंतरच्या काळात आणि विशेषतः “ऑपरेशन सिंदूर” अचानक स्थगित झाल्याबद्दल झालेल्या चर्चांवर पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधी पक्षांनी आठवले की अमेरिकेच्या दबावामुळे भारताला युद्ध थांबवावे लागू लागले, तर सत्ताधारी पक्षाने वेगळे प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने ऑपरेशन सिंदूरच्या अचानक स्थगितीवर भाजपवर टीका केली होती, तर आता हा नवीन खुलास्यावरही राजकीय वाद सुरू झाला आहे. चिदंबरम यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर शेअर केला असून, त्यांनी माजी गृहमंत्री तसेच त्यांच्या पक्षावर टीका केली आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी