नांदेड, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। नांदेड जिल्ह्याला विशेष पॅकेज देण्यासह विविध महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांना लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना आमदार चिखलीकर यांनी अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीची विस्तृत माहिती दिली.
नांदेड जिल्ह्याला कोल्हापूरच्या धर्तीवर मदत करावी. नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. सरसकट पिक विमा मंजूर करावा. नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील नुकसानग्रस्त नागरिकांना कोल्हापूर शहर जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीत जी मदत झाली त्याच धर्तीवर मदत व्हावी आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरीक, नुकसानग्रस्त, पूरग्रस्तांना भरीव मदत मिळावी या मागण्यांचा समावेश आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis